Type Here to Get Search Results !

नरक चतुर्दशी मराठी माहिती २०२१ | narak Chaturdashi marathi mahiti 2021

 नरक चतुर्दशी मराठी माहिती २०२१ | narak Chaturdashi marathi mahiti 2021

   

नरक चतुर्दशी मराठी माहिती २०२१

नरक चतुर्दशी म्हणजे काय 

नमस्कार मित्रांनो आज आपण नरक चतुर्दशीबद्दल जाणुन घेणार आहोत. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे चतुर्दशी. प्रत्येक वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते.या दिवशी सकाळी लवकर उठून उटणे लावतात त्यानंतर संपूर्ण शरीराला तेलाचे मर्दन करून आपल्या शरीरातील नरक रूपी पाप वासणांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायच असत.

  नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करतात. अभ्यंगस्नान म्हणजे सूर्योदयापूर्वी सुवासिक उटणे व तेलाचे मर्दन लावून स्नान करणे होय.

 या दिवशी अभ्यंगस्नाननंतर यमासाठी नरकात दिपदान करतात. आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृह हेच नरक होय. त्यामुळे या स्वच्छता गृहातच दिपदान करतात.


नरक चतुर्दशी कथा

  भगवान विष्णूने जेव्हा पृथ्वीच्या उद्धारासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी पृथ्वीच्या गर्भातून असुरासुराचा जन्म झाला  असुरासुर हा विष्णूचा पुत्र होय तो एक प्रसिद्ध असूर होता. जेव्हा  लंकापती रावणाचा वध झाला तेव्हा पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला. नरकासुराचा जन्म त्याच स्थानी  झाला होता तिथे जाणकी म्हणजे सितेचा जन्म झाला. त्यामुळे राजा जनक यांनी नरकासुर १६ वर्षाचा होईपर्यंत त्याचा सांभाळ केला. त्यानंतर पृथ्वी त्याला विष्णु जवळ घेऊन गेली आणि मग त्याला विष्णुने प्रानजोतिषपुर या राज्याचा राजा बनवले. नरकासुर हा मथुरेचा राजा कंस याचा मित्र होता. विदर्भाची राजकुमारी माया हिच्याशी त्यांने विवाह केला त्यावेळी भगवान विष्णूने त्याला एक दुर्मिळ असा रथ दिला होता. काही दिवसांपर्यंत निती आणि न्याय तत्वाने वागणाऱ्या नरकासुराने नंतर बानासुर नावाच्या राक्षसाच्या संगतीत पडून अधर्माने वागण्यास सुरुवात केली. आपली असुरी ताकत तो  मानवाला, गंधर्वांना आणि देवाना दाखवू लागला. सर्वांचा छळ त्याने सुरु केला त्यामुळे ऋषी वशिष्ठ यांनी नरकासुराला विष्णूच्या हाती मारले जाण्याचा श्राप दिला. या शापापासून वाचण्याकरता नरकासुराने कठोर तप केले आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले ब्रम्हदेवाकडून अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही त्याचा वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवूले त्यांच्या कन्या आणि त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नारकासूरने अशा एकूण सोळा हजार 100 स्त्रीयांना पळून नेले व मनी पर्वतावर एक नगर वसवले आणि त्या नगरामध्ये या स्त्रियांना बंदी बनवले. त्याने अगणित संपत्ती लुटली आणि अश्याच हव्यासापोटी देवमाता आदीतीची कुंडले आणि वरूनचे विशाल छत्र देखिल लुटले. त्याला मिळालेल्या अवंध्यत्वाच्या वरामुळे तो देव गांधर्व आणि मानवांना भयंकर त्रासदायक झाला होता.

     प्रागज्योतिषपुर हे नगर त्याची राजधानी होती ही राजधानी वेगवेगळ्या प्रकारच्या खंडकानी अग्नी पाणी इत्यादींनी वेढलेली होती.अनेक गिरिदुर्गानी वेढलेल्या या दुरजे राजधानीवर आक्रमन करणे अतिशय अवघड होते. मात्र श्री कृष्णाने गरूडावर स्वार होऊन त्या प्रागज्योतिषपुर या नगरावर श्वारी केली. दोघांमध्ये घणघोर लढाई झाली आणि सरतेशेवटी सत्याचाच विजय झाला. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे केले अन् त्याचा वध केला . नरकासुराच्या वधाने देवांना, मानवांना आणि गंधर्वांना तसेच राज्यातील प्रत्येक प्रजेला आनंद झाला. नरकचतुर्दशीच्या बंदीवासातील कुवारीकांना कुटुंबीय आता स्वीकारनार नाहीत हे जाणून कृष्णाने त्या १६ सहस्र कण्यांसोबत विवाह केला आणि  त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या १६ सहस्त्र बायका होत्या असा जो एक अपप्रचार करून हिंदू धर्माला बदनाम करणारी जी मंडळी आहे अशा सुधर्मीयांना ही माहिती तूम्ही नक्की कळवा . कृष्णाने केलेले हे कृत्य धर्माला आणि न्यायशास्त्रज्ञाला धरूनच आहे.काही दिवसांपासूनच कृष्णाच्या या पराक्रमाची मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी होऊ लागली. नरकासुराचा वध करताना कृष्णाच्या शरिरावर नरकासुराच्या रक्ताचे काही शिंतोडे उडाले होते.आणि हे रक्त साफ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेलाने स्नान केले. तेव्हा पासूनच या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा सुरू झाली असं म्हणतात.


नरक चतुर्दशीला आपण काय कराव

आकाशात तारे असतांना दाम्म मुहूर्तावर उठाव आणि अभ्यंगस्नान स्नान कराव.हे अभ्यंगस्नान करतांना हा मंत्र म्हणावा. 
 'यमलोकदर्शनाभावकामोs
 अभ्यंगस्नान करिष्ये |' 

अर्धी अंघोळ झाल्यावर अंघोळ करणार्याला औक्षण करावे म्हणजेच ओवाळावे.या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करावा. त्यात तिळाचे तेल टाकून दिव्यांच्या चारही बाजूला कापसाची वात लावावी आणि दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पुर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पुजा करावी.ही पुजा करताना हा मंत्र म्हणावा 

 'दत्तो दीप: चतुर्दश्यां
  नरक प्रीतये मया ||

  चतु: वर्ती समायु
  सर्वपापापनुत्तये ||'

यानंतर दिवा देवाऱ्यात ठेवावा.
सायंकाळी आपल घर दुकान कार्यालय आदि प्रज्वलित करून दिव्याने ते शुशोभित करावं वरिलप्रमाणे व्रत केल्यावर नरकापासुन मुक्ती मिळते अस म्हणतात.

हे सुध्दा वाचा⤵️


FAQ 

Q.1)जनक राजाने नरकासुराचा किती वर्षांचा होईपर्यंत सांभाळ केला ?

Ans.जनक राजाने नरकासुराचा 16 वर्षांचा होईपर्यंत सांभाळ केला. 

Q.2) नरकासुराने कोणासोबत विवाह केला ?

Ans.नरकासुराने विदर्भाची राजकुमारी माया हिच्याशी  विवाह केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad