Type Here to Get Search Results !

भाऊबीज मराठी माहिती गाणी कथा कविता २०२१ | Bhaubeej marathi mahiti song katha kavita 2021

 भाऊबीज मराठी माहिती गाणी कथा कविता २०२१ | Bhaubeej marathi mahiti song katha kavita 2021


भाऊबीज मराठी माहिती गाणी कथा कविता २०२१


नमस्कार मित्रांनो 
  दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सन असतो. भारतात दिवाळी हा सण सर्वात मोठा साजरा होणारा सण मानला जातो. या दिवाळीमध्ये साजरी होणारी भाऊबीज म्हणजे भाऊ आणि बहिणींच्या पवित्र नात्याचा उत्सव असतो. चला तर मग आपण भाऊबीजेबद्दल जाणून घेऊया.
    दिवाळी या सणाचा अंतिम दिवस म्हणजे भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया या सणाबद्दल कथा अशी आहे.

भाऊबीज कथा

    सूर्य आणि त्याची पत्नी छाया यांना दोन अपत्य होती मुलगा यम आणि मुलगी यमुना पुढेजाऊन जेव्हा यमुनेचा विवाह झाला तेव्हा यम आपल्या बहिणीला भेटण्यास फारच कमी वेळ जाऊ लागला.यम ही मृत्यूची देवता आहे. त्यामुळे आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडू नये असे यमाला वाटे. आपल्या बहिणीचा संसार सुखाचा चालावा यासाठी हा मार्ग स्वीकारला होता. यमुनेच्या कुटुंबियांना सुद्धा यमाचे त्यांच्या घरी येणे पसंत नसे. या सर्वांमुळे दुःखीकष्टी झालेल्या यमुनेला भावाचा हा दुरावा सहन होईनासा झाला. तिने यमाल बऱ्याचद आपल्या घरी येण्याची विनवणी केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

  अखेर तिने एकदा यमाकडुन वचन घेतले की तो तिला  भेटायला नक्की येईल त्यानुसार यम एक दिवस यमुनेला भेटायला गेला. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीयेचा.
 या दिवशी घरी आलेल्या यमाचे आपल्या भावाचे यथायोग्य आदरातिथ्य यमुनेने केले. यमाच्या म्हणजेच आपल्या भावाच्या घरी येण्याने तिला फार आनंद झाला. तिने यमाचे औक्षण केले औक्षण म्हणजे ओवाळणे. तीने गोडधोड जेवायला घातले.

  यम यमुनेच्या या आदरातिथ्याने प्रसन्न झाला आणि त्याने यमुनेला वस्त्रेय आणि अलंकार ओवाळणी म्हणून दिले. तसेच तिला जे हव ते मागण्यास सांगितले. यमुनेने वर मागितला की यमाने दरवर्षी कमीतकमी यादिवशी तरी तीला भेटण्यासाठी नक्की यावं.आणि या दिवशी ज्या स्त्रिया आपल्या भावाला प्रेम भावाने ओवाळतील, त्यांचे औक्षण करतील अशा त्यांच्या भावांचे यमाने मृत्यूपासुन सौरक्षण करावे.यमाची मृत्यूरूपी छाया त्यांच्या भावावर पडू नये. यमुनेने मागितलेल्या या वयावर यमाने तथास्तु म्हटले आणि तेव्हा पासून कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भाऊबीज सर्वत्र साजरी होऊ लागली.

    या दिवशी बहीण भावाला आदराने प्रेमाने ओवाळते आपल्या भावाला अपमृत्यु अकाली मृत्यु येऊ नये तो चिरंजीव रहावा यासाठी ती प्रार्थना करते. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड जेवण करतो आणि सायंकाळी द्वितीयेच्या चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीला आणि नंतर आपल्या भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी घालतो. आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देतो.

   हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जीवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाई देवीकडे काही मागणे मागते. तीच्या भावानुसार ते भावाला मीळते. त्यामुळे तीचे भावाशी असणारे देवानघेवान हिशोब काही प्रमाणात संपुष्टात येतात. त्यामुळे स्त्रीजिवात असलेले देवीतत्व जागृत होते आणि त्याकज लाभ भावाला होतो.
म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो.

    जर काही कारणाने बहिणीला भाऊ कोणी भेटलाच नाही तर ती चंद्राला आपला भाऊ समजून ओवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांबद्दल प्रेमाची भावना त्यांच्यामध्ये असावी यासाठी हा सण साजरा केला जातो. द्वितीयेचा चंद्र आकर्षक आणि वर्धमानता असा दाखवणारा आहे. तेव्हा चांदरबीजकोर प्रेमाने बंधुप्रेमाचे सुद्धा वर्धन होत रहावे, बंधुप्रेमही वाढत राहावे ही भाऊबीज या सनामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष आणि असूया निघाल्यामुळे या दिवशी सर्वत्र बंधुभावणेची कल्पना जागृत होते.म्हणून भाऊबीजेचा सन साजरा केला जातो.

 

अधिक माहितीसाठी 👇



भाऊबीज मराठी कविता

ताई घेता घरी 
मन आनंदून गेलं !
भाऊबीजेच्या सणाला
मन सुखावलं !!

आनंदाचे दाणं 
तिलाही मिळावं ! 
तिचं भाग्य थोर 
साच्या जन्मोजन्मी राहावं !!

ओवाळीते भाऊराया, 
म्हणे, आयुष्यवंत हो !
जन्म हा भाग्याचा, 
तू सदा सुखी राहो !!

भावा-बहिणीचं नातं 
साऱ्या नात्याहुन थोर ! 
माझी लाडकी बहिण 
जशी चंद्रकोर !!

दादा-वहिनी लाडकी 
पुरवे नातं हे जन्माचं !
माझं भाग्य आज थोर 
मी बहिण भावाची !!

कविता पहा 👇


भाऊबीज मराठी ओव्या

|| माळ्याच्या मळ्यामंदी उंच झाडाची गं विण 
अशी भावाची बहीण पाहे मागे गं वळून ||

|| बहीण भावंड एका भाकरीचा काला 
ऐक भाऊराया एका कुशीत जन्म झाला ||

|| वाटेने चालली वाण्या बामनाची गं जाळी 
त्याच्या गं मेळ्यामंदी भाऊराया वनमाळी||

|| सूर्य नारायणा तापू नको रे घाई घाई 
बंधू राजाने रे माझ्या आज छत्री नेली नाही ||

|| बहीण भावंड एका येलाची वाळकं 
आल्यात भावजया नाही राहिली वळकं ||

|| बहीण भावाची जाळी सांगा कशाने तुटली 
बंधुला माझ्या बाई राणी आबाड भेटली ||

|| आई बाच्या राज्यामंदी गुळाच्या गुळभेल्या 
भावाच्या राज्यामध्ये बहिणी पेड्यावरून गेल्या ||

||आई बापाच्या राज्यामध्ये मोठं मोकाट मुलुख 
भावाच्या राज्यामध्ये खोलीला मोठं कुलूप || 

|| आई बापाच्या राजी खाल्लं शिक्यावरल दही 
भावाच्या राज्यामध्ये ताकालाही सत्ता नाही ||

||भाऊ घेतो साडी चोळी भावजय आनमानी 
चंद्र माझा आहे नीट चांदणीला कोण मानी ||

|| भाऊ घेतो साडी चोळी भावजय डोळ मोडी 
सांगते शिंप्या दादा खणाची घाल घडी ||

YouTube link 👇



भाऊबीज मराठी गाणी बघा खालील लिंकवर जाऊन 👇



3) what's up status👇



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) भाऊबीज हा सण कधी साजरा केला जातो ?
Ans.दिवाळी या सणाचा अंतिम दिवस म्हणजे भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.

Q.2) यमुनेने यमाकडे कोणता वर मागितला ?
Ans.यमुनेने वर मागितला की यमाने दरवर्षी कमीतकमी यादिवशी तरी तीला भेटण्यासाठी नक्की यावं.आणि या दिवशी ज्या स्त्रिया आपल्या भावाला प्रेम भावाने ओवाळतील, त्यांचे औक्षण करतील अशा त्यांच्या भावांचे यमाने मृत्यूपासुन सौरक्षण करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad