Type Here to Get Search Results !

कार्तिक एकादशी पंढरपूर यात्रा २०२१ | Karatik Ekadashi Pandharpur Yatra 2021

कार्तिक एकादशी पंढरपूर यात्रा २०२१ | Karatik Ekadashi  Pandharpur Yatra 2021


कार्तिक एकादशी पंढरपूर यात्रा २०२१


पंढरपूरची कार्तिकी वारी कधी आहे

2021 ची कार्तिक एकादशी म्हणजे पंढरपुरची कार्तिकी वारी ही रविवारी १४ नोव्हेंबरला आहे की सोमवारी १५ नोव्हेंबरला आहे या विषयावरची माहिती आपण बघणार आहोत.
 या वेळेस कार्तिकी एकादशी ही दोन तिथीमध्ये आली आहे. एकादशी तिथीला बारस सुद्धा आहे त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अशावेळेस एकादशी तिथी कधी सुरू होते आणि कधी संपते हे आपण पाहुया.

  एकादशी तिथी सूरू होते रविवारी १४ नोव्हेंबरला पहाटे ५.५० मी पासुन ते १५ नोव्हेंबर सोमवारी सकाळी ६.४२ मी पर्यंत ही एकादशी तिथी आहे. त्यामुळे दोन्ही दिवशी सुर्योदय १४ तारखेला ६.४२ मी आहे तर १५ तारखेला ६.४३ मी आहे.
त्यामुळे एकादशी ज्या आहेत त्या दोन्ही दिवशी ह्या सुर्याला धरून म्हणजे एकादशी तिथीला सुर्योदय झालेला आहे.

 अशाप्रकारे ह्या दोन्ही एकादशी ह्या सुर्योदयाच्या अगोदर दोन्ही दिवस लागलेल्या आहेत त्यामुळे त्या उगवत्या एकादशी असं म्हटलं जातं आणि उगवत्या एकादशीला व्रत उपवास करायचा असतो. दिनांक १४ नोव्हेंबर रोजी स्मार्त एकादशी व १५ नोव्हेंबरला भगवात एकादशी ही या गावातील लोकांनी करायची आहे.

 १४ नोव्हेंबरला स्मार्त एकादशी आणि १५ नोव्हेंबरला भागवात एकादशी ही कोणकोणत्या गावात आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, मालेगाव, धुळे,रायगड, रत्नागिरी, देवगड व गुजरात, दिल्ली आणि हरियाणा या दिवशी १४ नोव्हेंबरला स्मार्त एकादशी आणि १५ नोव्हेंबरला भगवात एकादशी करायची आहे.

 १५ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी स्मार्त भागवात एकादशी असणारी जी काही गावे आहेत ती मालवण, सावंतवाडी,गोवा, सातारा,कराड, कोल्हापूर,नगर, औरंगाबाद, जळगाव,लातुर, सोलापूर, पंढरपूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि संपूर्ण कर्णाटक अशाप्रकारे दोन दिवसांमध्ये कार्तिक एकादशी तिथी आलेली आहे.

आता एकादशीचा नियम असा आहे की स्मार्त एकादशी ही साधुसंत महाराज जी विद्वान मंडळी आहेत जी धार्मिक मंडळी आहेत ते स्मार्त एकादशी हे व्रत करतात आणि भागवत एकादशी ही सर्वांची असते म्हणजे सर्वसामान्य लोकांची भागवत एकादशी असते.शिवाय पंढरपूरची एकादशी ही सोमवारी १५ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांनी सोमवारीच एकादशीचा उपवास करायचा आहे.

   जे वारकरी श्री विठ्ठलाचे खरे भक्त आहेत त्यानी यावेळेस दोन एकादश्या आल्यामुळे आणि त्या दोन एकादश्या उगवत्या असल्यामुळे दोन दिवस एकादशी करायला काही हरकत नाही. कारण येथे पाहीले तर दोन्ही दिवशी एकादशी तिथी आहेत व त्या उगवत्या एकादशी आहेत त्यामुळे ज्यांचे एकादशी चे उपवास आहेत त्यांना खरे पाहता रविवारी १४ नोव्हेंबरलाच उपवास करायचा आहे परंतु जर पंढरपूरला एकादशी सोमवारी १५ नोव्हेंबरला असेल तर उपवास हा त्यांच दिवशी केला पाहिजे. ज्यामुळे जर तुम्हाला एकादशी उपवास घडवायचाच असेल तर माझ्या मते दोन्ही दिवशी म्हणजे १४ ला व १५ ला उपवास करावा म्हणजे संभ्रम राहणार नाही. 

   दोन दिवस तुम्ही एकादशीचा उपवास करावा ज्याला हे शक्य नाही त्यांनी १५ नोव्हेंबरला पंढरपूरची कार्तिकी वारी व एकादशी आहे या दिवशी तुम्ही उपवास करावा. १६ तारखेला सकाळी ८.०१ मीनिटाच्या आतमध्ये बारस तिथी आहे त्यावेळेस व्रताचा पारणा म्हणजे उपवास सोडवावा व पांडुरंगांना प्रसन्न करून घ्यावे.



🔰 हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1)कार्तिक एकादशी पंढरपूर यात्रा कधी आहे ?
Ans.2021 ची कार्तिक एकादशी म्हणजे पंढरपुरची कार्तिकी वारी ही सोमवारी १५ नोव्हेंबरला आहे.

Q.2)स्मार्त एकादशीचा व्रत कोण करतात ?
Ans.स्मार्त एकादशी ही साधुसंत महाराज जी विद्वान मंडळी आहेत जी धार्मिक मंडळी आहेत ते स्मार्त एकादशी हे व्रत करतात.

Q.3) भागवत एकादशी कोणाची असते ?
Ans. भागवत एकादशी ही सर्वांची असते म्हणजे सर्वसामान्य लोकांची भागवत एकादशी असते.

Q.4) कार्तिकी एकादशी कधी आहे ?
Ans. कार्तिकी एकादशी ही सूरू होते रविवारी १४ नोव्हेंबरला पहाटे ५.५० मी पासुन ते १५ नोव्हेंबर सोमवारी सकाळी ६.४२ मी पर्यंत ही एकादशी तिथी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad