तुलसी विवाह पुजा आरती मंगळआष्टक २०२१ | tulsi vivah puja arti mangalastak 2021
2021 चा तुलसी विवाह / तुलसी बारस कधी आहे
तुलसी विवाहाची द्वादशी / बारस तिथी 15 नोव्हेंबर सोमवारी सकाळी 6.42 मी ते 16 नोव्हेंबर मंगळवारी सकाळी 8.04 मी पर्यंत आहे. 15 ला सूर्योदय 6.43 मी आणि 16 ला सुर्योदय 6.44 मी आहे.
आपल्याला तुळशी बारस ही संध्याकाळी करायची असते. आपण तुलसी विवाह करतो त्यामुळे मंगळवारी 16 तारखेला उगवती द्वादशी असली तरीही संध्याकाळी द्वादशी तिथी नाही त्यामुळे सोमवारी एकादशी ज्या दिवशी आहे त्याच दिवशी आपण सायंकाळी द्वादशी तिथी सुद्धा सुरू होते आणि ती संध्याकाळी द्वादशी तिथी असल्यामुळे सायंकाळी प्रदोष काळामध्ये तलशी विवाह करायचा आहे.
ज्यांना तुलशीचा विवाह बारसीला करणे शक्य झाले नाही त्यांनी बारसेपासुन ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह हा 5 दिवसाचा असतो. त्यामुळे तुळशीचे लग्न आहे सोमवारी 15 नोव्हेंबरपासून ते 19 नोव्हेंबरपर्यंत आपण करू शकतो.
तुळशी विवाह आरती
जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥
ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥
शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥
तुळशीचे लग्न मंगळआष्टक
स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् ।
मोरेश्वरम् सिध्दीतम् ।
बल्लाळो मुरूडम् विनायक महम् ।
चिंतामणी स्थेवरम् ।
लेण्याद्री गिरिजात्मकम् सूरवरम् ।
विघ्नेहरम् ओझरम् ।
ग्रामो रांजन संस्थितम् गणपती ।
कुर्यात सदा मंगलम् ॥ १ ॥
गंगा सिंधू सरस्वती चं यमूना,
गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेद्रतनया,
चर्मवती वेदीका ।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी,
ख्याता जया गण्डकी।
पूर्णा पूर्णे जलैः समुद्रसहिता,
कुर्यात सदा मंगलम् ॥२॥
राजा भीमक रूक्मिणीस नयनी,
देखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवरा,
कवणासि म्या देईजे।
आता एक विचार कृष्ण नवरा,
त्यासी समर्पू म्हणे ।
रूक्मा पुत्र वडील त्यासी पुसणे,
कुर्यात सदा मंगलम् ॥३॥
गौत्रे भिन्न परस्परांहुनी तशी,
की भिन्न ज्यांची कुळे ।
जीवें एकचि होती ती वरवधू,
आजन्म ज्यांच्यामुळे ।
ते ये ईशकृपे घडूनी सदनी,
मांगल्य वैवाहीके।
दांपत्या चिरनीत्य शंकरकृपे,
कुर्यात सदा मंगलम् ॥४॥
आली लग्नघटी समीप नवरा,
घेऊन यावा घरा।
गृह्याक्ते मधुपर्क पूजन करा
अंतर पटाते धरा ।
दृष्टादृष्ट वधूवरा न करता,
दोघे करावी ऊभी।
वाजंत्री बहु गलबला न करणे,
कुर्यात सदा मंगलम् ॥५॥
सुलग्न सावधान, इष्टदेवता, कुलदेवता,
ग्रामदेवता चिंतन मुहूर्त सावधान,
लक्ष्मीनारायण चिंतन सावधान,
ब्रम्ह सावित्री चिंतन सुलग्न सावधान,
उमामहेश्वर चिंतन सावधान,
जयघंटा शब्दप्रमाण सावधान,
अति सुलग्न सावधान.
🔰 हे सुध्दा वाचा⤵️
- नवरात्रीचे नऊ रंग
- कोरफड मराठी फायदे
- महात्मा गांधी जयंती निबंध भाषन २०२१
- पीतृपक्षात पुजा कशी करावी मराठी माहिती
- गणपती विसर्जन कसे करावे
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध भाषन चारोळ्या
- जागतिक ओझोन दिवस
- जेष्ठ गौरी पुजा विधी विसर्जन महाराष्ट्र
- ऋषीपंचमी मराठी माहिती २०२१
- हरितालिका माहिती पुजा कशी करावी २०२१
- रक्षाबंधन मराठी निबंध माहिती
- फ्रेंडशिप डे शुभेच्छा मराठी
- कोरोना लहान मुलांना झाला तर काय करावे
- मासिक पाळी मध्ये कोरोना लस घ्यावी का?
- जागतिक लोकसंख्या दिन २०२१
- राजमाता जिजाऊ मराठी निबंध भाषन
- कोरफड मराठी फायदे
- कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती निबंध 2021
- कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा 2021
- हळद चेहऱ्यावर लावण्याचे फायदे
- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१
- भारतीय पोस्ट नवीन भरती २०२१
- आवळा खाण्याचे फायदे मराठी माहिती
- कडुलिंबाचे फायदे मराठी
- MHT CET 2021 Result
- श्री चक्रधर स्वामी जयंती 2021आरती पाळणा भजन
- बलिप्रतिपदा पुजा महत्व कथा
- पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज
FAQ
Q.1) तुलसी विवाह कधी आहे ?
Ans.तुलसी विवाहाची द्वादशी / बारस तिथी 15 नोव्हेंबर सोमवारी सकाळी 6.42 मी ते 16 नोव्हेंबर मंगळवारी सकाळी 8.04 मी पर्यंत आहे. 15 ला सूर्योदय 6.43 मी आणि 16 ला सुर्योदय 6.44 मी आहे.
Q.2) तुलसी विवाह मंडळअष्टके ?
Q.3) तुलसी विवाह आरती ?