Type Here to Get Search Results !

राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस-पंजाब डख | Panjab dakh weather predictions

 राज्यात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस-पंजाब डख | Panjab dakh weather predictions 

    
राज्यात पुढील  2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस-पंजाब डख

पंजाब डख (हवामान अभ्यासक)

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुढील दोन दिवस हवामान अंदाज कसा असेल याबद्दलची माहिती बघणार आहोत.

राज्यात पुढील २ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता  हवामान विभागाने वर्तवली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पीकांचे काळजी घ्यावी.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील २ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत 1 डिसेंबरला पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

यामुळे १ आणि २ डिसेंबर या कालावधीत अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह,जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे - अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे


➡️ पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज


पुढील परिस्थिती कशी असेल

1 डिसेंबरला- रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच 


2 डिसेंबरला - रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे आणि जालना या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे


दरम्यान राज्यात पुढील २ दिवस- मेघगर्जनेसह पाऊस पडणार हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा  



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ

Q.1) पुढील दोन दिवस हवामान अंदाज कसा असेल ?

Ans.राज्यात पुढील २ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता  हवामान विभागाने वर्तवली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पीकांचे काळजी घ्यावी.

Q.2) पुढील दोन दिवस कोणकोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आह ?

Ans. रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे आणि जालना या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad