Type Here to Get Search Results !

हरभरा फवारणी माहिती नियोजन औषध | हरभरा मर रोग नियंत्रण | Harbhara favarni mahiti 2021

हरभरा फवारणी माहिती नियोजन औषध|हरभरा मर रोग नियंत्रण | Harbhara favarni mahiti 2021


हरभरा फवारणी माहिती नियोजन औषध


हरभरा फवारणी माहिती आणि नियोजन


नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा फवारणी कधी आणि कोणती करावी या बद्दलची माहिती पाहणार आहोत.
 
हरभरा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाच कडधान्य पीक आहे. यावर्षी बऱ्याच शेतकरी बांधवांनी हरभऱ्याची पेरणी केली आहे व त्यांचा हरभरा जवळपास 20 ते 25 दिवसाचा झाला आहे.


मर रोग माहिती 


 हरभरा पीकाची सर्वात मोठी समस्या म्हणजे मर रोगाची. मर नावाचा जो रोग आहे या रोगामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांना खुप काही नुकसान होत असते व बऱ्याच शेतकरी बांधवांना पाहिजे तेवढ उत्पादनही भेटत नाही.

 हरभऱ्याचे पीक हे पाण्यासाठी खूप सेन्सिटिव्ह पीक आहे. बरेच शेतकरी पेरणी करतात व पेरणी केल्यानंतर जास्त प्रमाणात पाणी देतात. खुप जास्त प्रमाणात पाणी देल्याने हरभरा जर्मिनेट झाल्यामुळे तो जागिच मरून जातो व जागीच तो सडून जातो.

 त्यामुळे मित्रांनो जे पहिले पाणी तुम्ही देणार ते 2 किंवा 2.30 तास तुम्ही द्या त्यापेक्षा जास्त पाणी तुम्ही देऊ नका. जर तुम्ही जास्त पाणी दिलं तर नक्कीच तुमच्या हरभऱ्यात मर रोग जास्त प्रमाणात आढळुन येईल.

हरभरा मर रोग नियंत्रण⤵️

https://youtu.be/qtIifQRZFkM


मर रोग नेमका येतो कसा

मर रोग हा फ्युजारियम(Fusarium) नावाची बुरशी आहे या बुरशीमुळे होणारा रोग आहे. ही बुरशी जमिनीमध्ये अतिरिक्त ओलावा झाल्यानंतर ही बुरशी जमिनीमध्ये वाढते आणि जमिनीमध्ये वाढुन हरभरा पीकाच्या मुळावर प्रादुर्भाव करून 
मुळावर जी फ्लोयम (phloem) नावाची टिशु (tissue) असते आणि झायलम (Zhylum) असते. या दोन्ही tissue ला पुर्णपणे ब्लॉक करते.
मग मित्रांनो ब्लॉक केल्यानंतर आपण जमिनीमध्ये जे खत देतो ते मुळापासून शेंड्यापर्यंत जात नाही आणि झाड कालांतराने शेंड्याकडुन पीवळ पडत आणि कालांतराने पुर्णपणे वाळुन जात. त्याला आपण झाड मरणे, मर, झाड मरणे किंवा उबळणे असं  म्हणत असतो.

 

हरभरा पहिली फवारणी 

  ज्यावेळेस आपण पहिली फवारणी करत असतो त्यावेळी आपल्या हरभरा पीकावरती आळ्यांचा सर्वात जास्त प्रादुर्भाव पहायला मिळतो. अशावेळेस आपण एक किटकनाशक वापरणे फारच गरजेचे असते.

सध्या असलेले जे ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पाऊस आणि त्यात आपण हरभऱ्याला पाणी देत असतो. अशावेळेस त्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. हरभरा पीकामध्ये मर दिसते, हरभऱ्याची पाणे  वाळलेली दिसतात आणि पानांवर डाग पडलेले देखील दिसतात.

 अशावेळेस आपण किटकनाशकासोबत एक बुरशीनाशक देखील combination मधे वापरणं गरजेचं असत आणि तीसरी गोष्ट म्हणजे हरभऱ्याच्या वाढीसाठी आणि हरभऱ्याचा चांगला फुटवा होण्यासाठी यामध्ये टॉनिकचा उपयोग करणे अतिशय गरजेचे असते.

हरभरा पहिली फवारणी औषधे

पहिली फवारणी करत असताना सर्वात भारी आणि सर्वात स्वस्त बेटर रिझल्ट देणारे म्हणजे imamectine benzonite या किटकनाशकाचा पहिल्या फवारणी मध्ये वापर करणे गरजेचे आहे व ते फायद्याचे देखील ठरते.

Imamectine benzonite या किटकनाशकांचा वापर करत असताना जो काही आपला 15 liter चा पंप असतो शेतकरी मित्रांनो त्या 15, liter च्या पंपासाठी 10 gm याप्रकरे प्रमाण घ्यायचं आहे. जर आळ्यांचा जास्त प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही 15 लिटर पंपासाठी 12gm घेतले तरी ते फायद्याचे ठरू शकते.

 यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशक देखील वापरायचे आहे जेणेकरून हरभरा पीकाची जी मर होत असते आणि जी काही हरभरा पीकावरील जे बुरशीजन्य रोग आहेत ते घालवण्यासाठी आपल्याला यात ROKO नावाच्या बुरशीनाशकाचा किंवा SAAF नावाच्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. पण ROKO या बुरशीनाशकाचा रिझल्ट हा छान असल्यामुळे तुम्ही ROKO या बुरशीनाशकाचा वापर करावा.

ROKO या बुरशीनाशकाचा वापर करत असताना जो काही आपला 15 liter चा पंप आहे त्या 15 liter च्या पंपासाठी 30 gm येवढं बुरशीनाशक वापरायचं आहे.आणि यासोबत हरभऱ्याची चांगली वाढ होण्यासाठी आणि चांगला फुटवा होण्यासाठी MAHADHAN 19.19.19 हे 75gm खत तुम्ही वापरू शकता. 

 19.19.19 या खताच्या एवजी तुम्ही सागरीका किंवा BIO vitta x हे टॉनिक तुम्ही वापरू शकता. सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे तुम्ही सागरिका किंवा BIO vitta x हे फायद्याचे ठरू शकते. हे वापर करत असताना 15 liter पंपासाठी 30 ml याप्रकरणे वापरायचं आहे.

पहिली फवारणी ही केव्हा केली गेली पाहिजे

साधारणतः हरभऱ्याची पेरणी केल्यानंतर ज्यावेळेस हरभरा चांगला उगऊन येईल साधारणपणे 20 ते 25 दिवसांच्या आसपास किंवा 20 ते 25 दिवसांच्या पुढे आपण पहिली फवारणी ही त्यामध्ये घेतली गेली पाहिजे.

 ज्या शेतकऱ्यांचा हरभरा हा कोरडवाहू आहे अशा
शेतकऱ्यांनी पहिल्या फवारणी मध्ये 19.19.19 या खताचा 100% वापर करावा. जेणेकरुन हरभरा पीकाचा चांगला फुटवा होईल आणि चांगली वाढ होण्यास मदत देखील होईल.

Emamectin Benzonite (10gm) + रोको (30gm) + सागरिका (30ml) 15 लिटर पंपासाठी याप्रमाणे फवारणी करावी.

हरभरा पहिली फवारणी👇


मर रोगाचे नियंत्रण कसे करावे

मर रोगाचे नियंत्रण करण्यासाठी सर्वात प्रथम चांगले वाण निवडायचं आहे. आपल्याला अशा वाणाची निवड करायची की जो मर रोगासाठी सहनशील असला पाहिजे.त्या वाणांमध्ये मर नावाचा रोग आला नाही पाहिजे. 

 आपल्याला ज्यावेळी पेरणी करायची आहे त्यावेळी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करण अत्यावश्यक आहे.मित्रांनो तुम्ही बीजप्रक्रिया केली म्हणजे 100 % मर येणार नाही असं अजिबात नाही. परंतु जो रोग आहे तो खुप काही कमी प्रमाणात येणार आहे.

 त्याचबरोबर आपण 20 ते 25 दिवसाला पहिली फवारणी करणार त्यामध्ये अळीनाशक जे काही विद्राव्य खत असेल टोनिक असेल. आपल्याला एका आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा देखील वापर करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही जे रोको नावाचं औषध आहे त्याचा किंवा साफ नावाचं बुरशीनाशक आहे याचा देखील वापर करू शकता किंवा hexaconazol ,propaconazol याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता.


तर मित्रांनो योग्य वेळी योग्य बुरशीनाशकाचा वापर करून जर मर रोगाची नियंत्रण केले तर नक्कीच आपलं होणार नुकसान टळू शकते व आपल्याला हरभऱ्यापासुन चांगले उत्पादन भेटू शकते.


हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) हरभरा फवारणीसाठी कोणती औषधे वापरावी ?
Ans.Emamectin Benzonite (10gm) + रोको (30gm) + सागरिका (30ml) 15 लिटर पंपासाठी याप्रमाणे फवारणी करावी.

Q.2) मर रोग हा कश्यामुळे होतो ?
Ans. मर रोग हा फ्युजारियम(Fusarium) नावाची बुरशी आहे या बुरशीमुळे होणारा रोग आहे.

Q.3) हरभऱ्याची पहिली फवारणी ही कधी करावी ?
Ans.साधारणतः हरभऱ्याची पेरणी केल्यानंतर ज्यावेळेस हरभरा चांगला उगऊन येईल साधारणपणे 20 ते 25 दिवसांच्या आसपास किंवा 20 ते 25 दिवसांच्या पुढे आपण पहिली फवारणी ही त्यामध्ये घेतली गेली पाहिजे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad