Type Here to Get Search Results !

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज | Panjab dakh new weather prediction

 पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज | Panjab dakh new weather prediction 

   
         
पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज


पंजाब डख (हवामान अभ्यासक)

  नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून आठवडाभर हवामान अंदाज कसा असेल याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
 

आजपासूनचा नविन हवामान अंदाज

 राज्यात आज 27 नोव्हेंबर उद्या 28,29 आणि 30 नोव्हेंबर या दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे पण राज्यात थंडीची चाहूल लागणार आहे.

 राज्यात सगळीकडे थंडी वाढलेली दिसून येईल आणि राज्यात 27,28,29 आणि 30 नोव्हेंबर या तारखेमध्ये धुई, धुके जास्त प्रमाणात असणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या धुईपासुन आपले कोणते नुकसान होईल याची काळजी घ्यावी.

 या धुईमुळे तुर पीकाला फटका बसतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तुरीवर एक किटकनाशकांची आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी.

    

➡️शेतमालाचा बाजारभाव घरबसल्या कसा पहावा

राज्यात पाऊस कधी पडणार आहे

राज्यात 1 डिसेंबर,2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर रोजी पाऊस पडणार आहे आणि तो पाऊस भाग बदलत पडणार आहे.
हा जोराचा पाऊस सर्वदूर नसनार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. 

राज्यात या पावसामुळे काही पीकांना फायदा होईल तर काही पीकांचे नुकसान देखील होऊ शकते म्हणून शेतकरी बांधवांनी आपल्या पीकांचे नुकसान होऊ नये यासाठी सतर्क रहावे.


भारतातील इतर राज्यात पाऊस कसा असेल

1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर हा पाऊस आपल्या भारतातील ईतर राज्यात कसा असणार आहे हे आपण पाहणार आहोत.

 या तीन दिवसांमध्ये भारतामधील आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या तीन राज्यात खुप जास्त पाऊस पडणार आहे.महाराष्ट्रात देखील हा पाऊस पडणार आहे पण हा पाऊस भाग बदलत पडणार आहे.

महाराष्ट्रात 3 नोव्हेंबर पर्यंतच पावसाची सावट असणार आहे त्यानंतर 4 तारखेला लगेच राज्यात धुई धुके पाडायला सुरुवात होईल.राज्यात 4 डिसेंबरपासून थंडिला सुरूवात होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची काळजी घ्यावी.

5 डिसेंबर,6 डिसेंबर आणि 7 डिसेंबर रोजी राज्यामध्ये कडाक्याची थंडी जाणवेल.



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) पंजाब डख यांचा हवामान अंदाज काय आहे ?
Ans.राज्यात आज 27 नोव्हेंबर उद्या 28,29 आणि 30 नोव्हेंबर या दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे पण राज्यात थंडीची चाहूल लागणार आहे.

Q.2) राज्यात पाऊस कधी पडणार आहे ?
Ans.राज्यात 1 डिसेंबर,2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर रोजी पाऊस पडणार आहे आणि तो पाऊस भाग बदलत पडणार आहे.

Q.3) 1,2,3 डिसेंबर रोजी कोणकोणत्या राज्यात पाऊस पडणार आहे ?
Ans.1,2,3 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये भारतामधील आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा या तीन राज्यात खुप जास्त पाऊस पडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad