Type Here to Get Search Results !

पंजाब डख यांचा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा हवामान अंदाज | Punjab Dakh's weather forecast for November 30, 2021

पंजाब डख यांचा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा हवामान अंदाज | Punjab Dakh's weather forecast for November 30, 2021


पंजाब डख (हवामान अभ्यासक)


            पंजाब डख (हवामान अभ्यासक)

पुढिल हवामान अंदाज - राज्यात 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडे राहील. तर 23 नोव्हेंबर पासून राज्यात सुर्यदर्शन होऊन थोडी थोडी थंडीला वाढ होत जाणार आहे.

   महाराष्ट्र राज्यात 23,24 नोव्हेंबर नंतर खूप जास्त थंडी वाढणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपली काळजी घ्यावी. 23,24 नोव्हेंबर नंतर राज्यात धुई किंवा धुके वाढणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या द्राक्ष बागायतदारांनी आपल्या बागेचे सौरक्षन करावे.

   तसेच आपल्या राज्यामध्ये तुर सगळीकडे सध्या फुल अवस्थेत आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या तुरीच्या फुलांसाठी एक बुरशीनाशक आणि एक किटकनाशकाची फवारणी करून आपण आपल्या तुरीचे नुकसान होण्यापासून वाचवावे.

तसेच राज्यात हरभऱ्याची पेरणी देखील पुर्ण झाली आहे. पण हरभरा पेरल्यानंतर हरभऱ्याला मर रोग देखील आहे.म्हणुन माझ्या सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट करायची की हरभऱ्याचा मर रोग कमी करण्यासाठी एक बुरशीनाशकाची फवारणी आणि एक किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. कारण की आभाळ असल्यामुळे त्या हरभऱ्यावर बारीक अशी खळी आलेली आहे. तर त्यामुळे तुम्ही 1 किटकनाशकाची आणि 1 बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी.


पंजाब डख लाईव्ह⤵️

➡️सातबारा उतारा मोबाईलवर कसा काढावा


आपल्या देशात ईतर राज्यातील हवामान परिस्थिती कशी राहील

यामध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक,केरळ या राज्यांमध्ये 28 नोव्हेंबर,29 नोव्हेंबर,30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी या चार राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे. तरी या सर्व राज्यातील जनतेने सतर्क राहावे.

 आंध्र प्रदेश आणि केरळ या दोन राज्यांत पावसाचे प्रमाण हे थोडे जास्त राहणार आहे त्यामुळे तेथील जनतेने सतर्क राहावे.
            




हे सुध्दा वाचा⤵️


 
FAQ
Q.1) पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज काय सांगतो ?
Ans.राज्यात 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडे राहील. तर 23 नोव्हेंबर पासून राज्यात सुर्यदर्शन होऊन थोडी थोडी थंडीला वाढ होत जाणार आहे.

Q.2) हरभऱ्याची मर कमी करण्यासाठी काय करावे ?
Ans.हरभऱ्याचा मर रोग कमी करण्यासाठी एक बुरशीनाशकाची फवारणी आणि एक किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. 

Q.3) भारतातील इतर राज्यात पाऊस कसा राहील ?
Ans.तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक,केरळ या राज्यांमध्ये 28 नोव्हेंबर,29 नोव्हेंबर,30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी या चार राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad